उपचाराअभावी रुग्णाचा व्हीलचेअरवरच मृत्यू, पालिकेच्या 'या' रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

well chair
well chair

मुंबई : उपचाराअभावी 3 तास खोळंबलेल्या एका रुग्णाचा व्हीलचेअरवरच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात घडला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे हा बळी गेल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान नातेवाईकांच्या तक्रारीनंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुलुंडच्या एम. टी. अग्रवाल रुग्णालयात कारकून विभागात काम करणाऱ्या दीपक भोईर या कर्मचाऱ्यासोबतच हा संतापजनक प्रकार घडला आहे. भिवंडीमध्ये राहणाऱ्या दीपक भोईर यांचे 62 वर्षीय वडील राजाराम भोईर यांची तब्येत अचानक पहाटे खराब झाली. त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला, मात्र भिवंडीतील सर्व रुग्णालये बंद असल्याने दीपक यांनी वडिलांना रुग्णवाहिकेतून सकाळी साडेसहा वाजता तात्काळ एम. टी. रुग्णालयात आणले. त्यावेळी ओपीडीमध्ये डॉक्टर नव्हते, ते 20 मिनिटांनंतर आल्याचे दीपक यांनी सांगितले. त्यानंतर ओपीडीतील डॉक्टरांनी वडिलांना पहिल्या मजल्यावरील आयसीयूत नेण्यास सांगितले. वडिलांना आयसीयूत नेल्यावर तिथेही डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे दीपक यांना वडिलांना व्हीलचेअरवरच ठेऊन डॉक्टरांची वाट पाहावी लागली. दोन तासांनंतर डॉक्टर आल्यानंतर त्यांनी दीपक यांच्या वडिलांना मिठागराजवळील अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. वडिलांना पहिल्या मजल्यावरून पुन्हा तळ मजल्यावर नेत असतानाच वडील काहीच हालचाल करीत नसल्याचे दीपक यांच्या लक्षात आले. त्यानंतर ओपीडीतील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर संतापलेल्या दीपक यांनी, रुग्णालयातील कर्मचारी असूनही आम्हाला जर अशी वागणूक मिळते, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला.

जबाबदार डॉक्टरांवर कारवाईची मागणी
तर ओपीडी , आयसीयूमध्ये डॉक्टर का उपस्थित नव्हते? रुग्णावर वेळीच उपचार का गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून जबाबदार डॉक्टरांवर कारवाईची मागणी शिवसेना कामगार सेनेचे पदाधिकारी विजय नाईक यांनी केली आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर 3 तास वडिलांना कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट मिळाली नाही. आयसीयूत दोन तासांहून अधिक काळ डॉक्टर नव्हते. त्यामुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
दीपक भोईर, कर्मचारी, एम टी रुग्णालय

रुग्णालयात घडलेला हा प्रकार चुकीचा आहे. साहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. प्रदीप आंग्रे, अधिष्ठाता, एम टी अग्रवाल रुग्णालय

Patient without treatment Death in a wheelchair

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com