जीटी रुग्णालयात ब्रिटन, पश्चिम आशियातून आलेल्या रुग्णांवर होणार उपचार

जीटी रुग्णालयात ब्रिटन, पश्चिम आशियातून आलेल्या रुग्णांवर होणार उपचार

मुंबईः  मुंबईच्या जी.टी. रुग्णालयात ब्रिटन आणि पश्चिम आशियामधून मुंबईत परतलेल्या रूग्णांना दाखल करुन उपचार केले जाणार आहेत. परदेशात कोरोना व्हायरसच्या नव्याने आढळलेल्या स्ट्रेनमुळे भारतातही चिंतेचे  वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सरकारी रुग्णालय गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयाचे अंशतः कोविड -19 सुविधेमध्ये रूपांतर केले गेले आहे. जे लोक ब्रिटन आणि पश्चिम आशियातून परत आले आहेत आणि ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना इथे प्रवेश देण्यात येईल. संक्रमित देशांतील सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना जीटी रुग्णालयात पाठवले जाईल.

“या रूग्णांना दाखल करण्यासाठी आम्ही फक्त जीटी रुग्णालयाची तरतूद केली आहे. जेणेकरून नव्या व्हायरल स्ट्रेनमुळे त्यांना संसर्ग झाल्यास ते इतर कोविड -19 रूग्णांना संक्रमित करु शकणार नाहीत आणि संक्रमण पुढे पसरणार नाही. त्यांना इतरांपासून वेगळे करणे महत्वाचे आहे, असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.

जीटी रुग्णालयाच्या एका इमारतीत 40 खाटांचा उपयोग कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी तर उर्वरित नॉन कोविड रूग्णांसाठी केला जाईल. राज्य अधिका-यांनी सांगितले की, व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या रुग्णांना एकत्र ठेवले तर संसर्ग होण्याचा धोका अधिक असू शकतो.

“आम्हाला सर्व कोविड -19 पॉझिटिव्ह केसेस यूके किंवा मध्यपूर्वेकडून जीटी रुग्णालयात पाठवण्यास सांगितले आहे. इतर सर्व कोविड -19 च्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात, असे सेंट जॉर्ज  रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. सेंट जॉर्ज रुग्णालयात 220 बेड्स असून सध्या फक्त 35 रुग्ण दाखल आहेत. 

कोविड -19 चा आलेख आता खाली सरकत असल्यामुळे शहरातील इतर कोविड सेंटरमध्येही फारच कमी बेड भरलेले आहेत. बीकेसी जंबो सेंटरमध्ये 1,026 पैकी 279 बेड्स भरलेले आहेत. दहिसर जंबो सेंटरमध्ये 442 बेड्स पैकी 84 बेडस् भरलेले आहेत. मुलुंडमध्ये 135 बेड्स भरले आहेत. आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात 1,495 पैकी 691 बेड्स भरले आहेत.  नेस्को गोरेगावमध्ये 2,040 खाटांपैकी केवळ 136 बेड्स भरलेले आहेत. रुग्णालयाचे कोविड केंद्रात परत रूपांतर करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासणीचे काम भारताने सुरू केले.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Patients from Britain and West Asia will be treated at Mumbai GT Hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com