पालघरमधील रुग्णांचा मुंबई, ठाणे फेरा थांबणार

ठाण्याला धाव घेणाऱ्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
Health Service
Health Servicesakal media

वसई : पालघर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने प्रशासनाने १० एकर जागेवर अद्ययावत स्वरूपाचे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयाबरोबरच अनेक सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे किरकोळ उपचारासाठीही मुंबई, ठाण्याला धाव घेणाऱ्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कामांना मंजुरी मिळालेले हे रुग्णालय पालघर तालुक्यातील सरकारी विश्रांतीगृह येथे उभारण्यात येणार आहे. याकरिता अग्निशमन दलाचे ना हरकत, वास्तूविशारद डॉ. हिमांशू भूषण यांच्याकडून अंतिम मंजुरी, राज्य पर्यावरण विभाग, सिडकोकडून बांधकामविषयक परवानगी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता, विद्युत विभागाकडूनही तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. यासाठी गठीत केलेल्या समितीमार्फत कामाच्या निविदेला मान्यता प्राप्त होताच कंत्राटदारास काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासाठी जिल्ह्यातील अनेक मुले बाहेर जातात; मात्र नर्सिंगसंबंधी महाविद्यालयही याच जागेत उभारण्यात येणार आहे.

गैरसोय टळणार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर हद्दीत होणारे अपघात पाहता मनोर, खानिवडे या ठिकाणी रुग्णालयासाठी ९९ गुंठे जागा तसेच पालघर येथे ६५ खाटांचे अद्यावत उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी सरकारकडे केली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com