KEM hospital
KEM hospital

केईएम रुग्णालयाचा मोठा निर्णय! कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना 'या' गोष्टीची बंदी.. 

मुंबई: कोरोना विरोधातील लढाईमध्ये मुंबई महानगर पालिकेकडून अनेक महत्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

अशात बुधवारी मुंबई महानगर पालिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केईएम रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी याठिकाणी असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

राज्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 32 हजार पार झाला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवण्यापासून ते रुग्णालयात बेड आणि आयसीयूची सुविधा वाढवण्यावर मुंबई महानगर पालिकेकडून भर दिला जात आहे.

अशातच केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना येण्यास बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय आता महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईंकांना यापुढे फोनवरुन माहिती दिली जाणार आहे. 

यासंदर्भात केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, ' सध्या असे निदर्शनास येत आहे की केईएम रुग्णालयात एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला उपचारासाठी दाखल केले तर त्याचे नातेवाईक सतत रुग्णालयात येतात. त्यामुळे रुग्णालयात फक्त गर्दी होत नाही तर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण होण्याची जास्त भीती असते. पुढील दोन दिवसानंतर हा नियम लागू होईल. संसर्ग रोखण्यासाठी ही निर्णय घेण्यात आला आहे. 

तसंच, यापुढे केईएम रुग्णालयाकडून दररोज कोरोनाबाधित रुग्णाची माहिती त्याच्या नातेवाईकांना फोनच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाकडून दररोज कमीत कमी एक फोन केला जाईल आणि त्यांना त्यांच्या रुग्णाच्या प्रकृतीची माहिती दिली जाईल. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना त्याच्या प्रकृती माहिती मिळेल आणि त्यांचा रुग्णालयात येण्याचा हेलपाटा सुद्धा वाचेल.

patients relatives will not allowed in KEM hospital read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com