पाटील - मलिक वाद पेटला 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

मुंबई  - राजधानी मुंबईत सोळा वर्षांनंतरही पाय रोवता आलेले नसताना जे प्रमुख नेते म्हणून परिचित आहेत त्यांच्यातच "हाणामारी' झाल्याने मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नैराश्‍य आले आहे. माजी खासदार संजय दिना पाटील व "राष्ट्रवादी'चे प्रवक्‍ते नवाब मलिक यांच्यात झालेला संघर्ष केवळ एका वॉर्ड अध्यक्षाच्या निवडीवरून पेटल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

शिवाजीनगर हा भाग म्हणजे तसा नवाब मलिक यांचा मतदारसंघ. मुस्लिम बहुल या वॉर्डात आपल्या मर्जीतला वॉर्ड अध्यक्ष नेमण्याचा आग्रह मलिक यांनी धरला होता. तर हाच वॉर्ड संजय दिना पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने तिथे आपल्या मर्जीतलाच वॉर्ड अध्यक्ष राहील असा हट्‌ट त्यांनी धरला होता. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मलिक यांनी सुचवलेल्या कार्यकर्त्याला वॉर्ड अध्यक्षाचे पत्रही दिले होते. पण, संजय पाटील यांनी त्याला कडाडून विरोध केला. वॉर्ड अध्यक्षाचे पत्र मागे घेतो असे अहिर यांनी सांगितले. पण, मलिक यांनी आयोजित केलेला मेळावादेखील रद्‌द करण्याची मागणी त्यांनी केली. यावरून मलिक व पाटील यांच्यात सकाळी दूरध्वनीरून चर्चा झाली. मलिक यांनी मेळावा रद्‌द होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यावरून पाटील यांनीही मेळावा कसा होतोय असा सज्जड इशारा दिला. मेळाव्याच्या ठिकाणी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत पुढे हाणामारीत रूपांतर झाले. गोळीबारही झाला. काही कार्यकर्त्यांनी तलवारी व चॉपर देखील उगारले. 

अखेर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही नेत्यांमधील संघर्षावर पक्षश्रेष्ठ सांगतील तशी कारवाई करण्यात येईल, असा सूचक इशारा आज दिला. मात्र, टोकाला गेलेला हा संघर्ष भविष्यात मिटण्याची शक्‍यताच धुसूर असल्याने "राष्ट्रवादी'चे सर्वच नेते हवालदिल झाले आहेत. 

Web Title: Patil - Malik disputes