पाटील यांचे लोकहिताला प्राधान्य

मुंबई ः शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतना एन. डी. पाटील.
मुंबई ः शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतना एन. डी. पाटील.

मुंबई : यशवंतराव चव्हाण उत्तम वाचक, साहित्यिक होते. अशा व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसह स्वतःच्या कामापेक्षा लोकहिताला प्राधान्य दिले.

त्यांनी कर्मवीर अण्णांच्या विचारांशी बांधिलकी माणून कर्मवीरांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणले, असे कौतुकोद्‌गार शरद पवार यांनी काढले. एन. डी. पाटील यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व यशवंतराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस शरद काळे, विश्‍वस्त अजित निंबाळकर, डॉ. अनिल काकोडकर, राम खांडेकर, डॉ. सदानंद गोडसे, दिलीप माजगांवकर, शरद काळे, बाळासाहेब पाटील, सरोज (माई) पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, कलाप्पा आवाडे, डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. मिळालेल्या पुरस्कार रकमेपैकी १ लाख रुपये रक्कम रयत शिक्षण संस्थेला, तर १ लाख रुपये इचलकरंजी येथील वाचनालयाच्या इमारतीसाठी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

डॉ. अभिजित बॅनर्जी यांना पुरस्कार जाहीर
या वेळी राम खांडेकर यांच्या ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. यावेळी राम खांडेकर, डॉ. अनिल काकोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुढील वर्षीचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार डॉ. अभिजित बॅनर्जी यांना घोषित करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com