यशवंतरावांचे ऐकायला हवे होते : जावडेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

डोंबिवली : केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना शरद पवार आणि इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नोटाबंदीबाबतचे म्हणणे ऐकले असते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटाबंदीचा निर्णय घायची गरजच पडली नसती, असे मत व्यक्त करत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शरद पवारांवर तोफ डागली.

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्‌घाटनप्रसंगी जावडेकर बोलत होते. जावडेकर म्हणाले, की चव्हाण नोट बदलण्याबाबत आग्रही होते; मात्र त्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही. चव्हाण यांच्या शिष्यांनी किमान आज तरी त्यांचे म्हणणे समजून घ्यावे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार हा समाजाला लागलेला कर्करोग आहे. या विळख्यातून सुटण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज होती आणि तो निर्णय मोदी यांनी घेतला. 70 वर्ष लोक तांदूळ, रॉकेलसाठी रांगेतच उभे राहत होते. आता फक्त काही दिवसच देशाच्या भल्यासाठी जनतेला रांगेत उभे राहावे लागणार आहे.

देशात 77 कोटी डेबिट कार्ड आहेत; मात्र याचा उपयोग फक्त एटीएम कार्ड म्हणून म्हणून केला जातो. वास्तविक डेबिट कार्डचा उपयोग वस्तू खरेदी करताना आणि इतर व्यवहारांतही होऊ शकतो, असे जावडेकर म्हणाले.

Web Title: pawar should have listened to yb chavan, says javadekar