"पे ऍण्ड पार्क'ची योजना साफ फसली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

तुर्भे -  वाशीतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उदात्त हेतूने सेक्‍टर- 2 मधील रस्त्याच्या कडेला पालिकेने "पे ऍण्ड पार्क'चा उपक्रम 10-15 दिवसांपूर्वी सुरू केला आहे. परंतु त्यामुळे हा रस्ता आणखी अरुंद झाल्याने पालिकेची ही योजना फसली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी चालकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. 

वाशीतील बेकायदा पार्किंग आणि वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून पालिकेने सेक्‍टर- 2 मध्ये वाहनतळ सुरू केले. परंतु तेथे पैसे मोजावे लागत असल्याने वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत आहेत. हा रस्ता अगोदरच अरुंद आहे. त्यात या बेकायदा पार्किंगची भर पडत असल्यामुळे येथील परिस्थिती बिकट झाली आहे. वाशी पोलिस ठाण्यापासून एमजीएम रुग्णालयापर्यंत रस्त्यावरच "पे ऍण्ड पार्क' सुरू केले आहे. यामुळे रस्ता आणखी अरुंद झाल्याने वाहनचालकांसाठी ती डोकेदुखी बनले आहे. या रस्त्यावर आधीच दुतर्फा पार्किंग असते. त्यात आता "पे ऍण्ड पार्क'मुळे हा रस्ता आणखी अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढली आहे. समोरून येणारे वाहन जात नाही तोपर्यंत थांबावे लागते. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे "पे ऍण्ड पार्क' सुरू करताना वाहतूक विभागाला कळवणे गरजेचे होते. परंतु पालिकेने तसे केलेले नाही. 

रस्त्यावरील कोंडी कमी करण्याच्या हेतूने वाहतूक विभागाला विचारूनच "पे ऍण्ड पार्क' सुरू करण्यात आले आहे. 
- दादासाहेब चाबूकस्वार, पालिका उपायुक्त 

महापालिकेने हे "पे ऍण्ड पार्क' सुरू करताना आमच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा विचारणा केलेली नाही. 
- संदीप कदम, वाहतूक पोलिस अधिकारी 

Web Title: Pay and park plan failed