JusticeForPayal : पायलची हत्या करण्यात आली; आईचा आरोप

Payal Tadvi
Payal Tadvi

मुंबई : पायलने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिचे रॅगिंग करणाऱ्यांना अटक व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली.

नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या. त्यानंतर त्यांनी खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. पायल यांचा स्त्रीरोग विभागातील तीन डॉक्‍टरांकडून वर्षभर छळ सुरू असल्याचा आरोप आहे. डॉ. पायल यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप असलेल्या तीन डॉक्‍टरांना मार्ड संघटनेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या तिन्ही डॉक्टरांना अटक व्हावी यासाठी आज आंदोलन करण्यात आले.  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नायर रुग्णालयाबाहेर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा निषेध केला. 

पायलला त्रास देणाऱ्यांना अटक करू : महाजन
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी तडवी कुटुंबीयांची भेट घेत चर्चेसाठी रुग्णालयात घेऊन गेले. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे. उद्या शिष्टमंडळासोबत चर्चा करू, पायलला त्रास देणाऱ्यांना अटक करू, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com