‘जामिनावरील सुनावणीचे व्हिडिओ चित्रण नाही’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

‘डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या जामिनावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडीओ चित्रण  होणार नाही,’ असे बुधवारी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. तडवीच्या कुटुंबियांनी केलेली व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आता नियमित न्यायालयात शुक्रवारी (ता. २१) जामिनावर सुनावणी होणार आहे.

मुंबई - ‘डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या जामिनावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडीओ चित्रण  होणार नाही,’ असे बुधवारी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. तडवीच्या कुटुंबियांनी केलेली व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आता नियमित न्यायालयात शुक्रवारी (ता. २१) जामिनावर सुनावणी होणार आहे.

नायर रुग्णालयातील डॉ. पायलने वरिष्ठ डॉक्‍टरांच्या छळाला कंटाळून रुग्णालयाच्या वसतिगृहातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद पोलिसांनी नोंदवली आहे. डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन वरिष्ठ डॉक्‍टरांना पोलिसांनी अटक केली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे; मात्र पोलिसांनी ‘ॲट्रॉसिटी’ आणि रॅगिंगचा गुन्हा नोंदवल्यामुळे जामिनाच्या सुनावणीचे व्हिडिओ चित्रण करण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Payal Tadvi Suicide Case Video Result Bell Court