'पेण अर्बन बॅंकेच्या मालमत्तांचे मूल्यांकन करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई  - दिवाळखोरीत निघालेल्या पेण अर्बन सहकारी बॅंकेच्या सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले.

मुंबई  - दिवाळखोरीत निघालेल्या पेण अर्बन सहकारी बॅंकेच्या सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले.

हे मूल्यांकन करण्यासाठी न्यायालयाच्या नोंदणीकृत मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर यापैकी कोणती मालमत्ता विकली जाऊ शकते, याचा तसेच बॅंकेत जमा असलेली सुमारे 25 कोटी रुपयांची रक्कम कशा प्रकारे वितरित करता येईल, याचाही विचार करता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यभरात बॅंकेच्या विविध प्रकारच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांची विक्री करून खातेधारकांचे पैसे परत करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. त्यानुसार संबंधित मालमत्तांची तपशिलासह यादी न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही न्यायाधीश व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

Web Title: pen arban bank property rate