निगडे नदीत मुंबईतील पर्यटक बुडाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

त्यांना प्रवाहाचा अंदाज न आल्याने रवी चव्हाण (वय 38, रा. चुनाभट्टी) हा पाण्यात बुडून वाहून गेला आहे.

मुंबई (बातमीदार) ः पेण तालुक्‍यातील निगडे नदीत मुंबई-चुनाभट्टी येथील पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. वडखळ पोलिस ठाणे हद्दीतील निगडे नदीवर आज चुनाभट्टी येथील नऊ पर्यटक पर्यटनासाठी नदी किनाऱ्यावर गेले होते. त्यांच्यापैकी काही जण नदीत पोहण्यासाठी उतरले असता, त्यांना प्रवाहाचा अंदाज न आल्याने रवी चव्हाण (वय 38, रा. चुनाभट्टी) हा पाण्यात बुडून वाहून गेला आहे. या घटनेची बातमी मिळताच वडखळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहपोलिस निरीक्षक अजित शिंदे त्यांच्या पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी घटनास्थळी जाऊन तेथील पोलिस पाटील, ग्रामस्थ यांच्या मदतीने पाण्यात उतरून शोध घेतला; परंतु बुडालेल्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यांना बोलाविण्यात आलेले होते; परंतु अंधार पडल्याने व नदीचा प्रवाह जास्त असल्याने शोध लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी बाहेरील टीमला बोलाविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pen issue