नगराध्यक्षांकडून वसूल केला दंड 

मुरलीधर दळवी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुरबाड (ठाणे) : पार्किंगची पुरेशी व्यवस्था न करताच रस्त्यावर गाडया पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या मुरबाड नगरपंचायत प्रशासनाला गुरुवारी (ता 23) नगराध्यक्षा वापरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या गाडीला जॅमर लावुन दंडात्मक कारवाई करण्यास मनसे शहराध्यक्ष नरेश देसले यांनी भाग पाडले.

मुरबाड नगर पंचायतीने 20 ऑगस्ट पासून मुरबाड शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने पार्क केल्यास वाहनांना जॅमर लावून 200 रुपये दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. वाहने पार्किंग करण्यासाठी पुरेश्या जागेची निवड न करता दंड आकारण्यास सुरुवात केल्याने रोज वाहन चालक व नगर पंचायत कर्मचारी यांचे मध्ये खटके उडत होते. मुख्य रस्त्यावर सम व विषम तारखांना गाड्या उभ्या करण्याची मागणी ग्रामस्थ करत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

मात्र मनसे कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या गाडीलाच जॅमर लावण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडल्या मुळे खडबडून जागे झालेल्या नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर व मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी मुरबाड बाजार पेठेतील रस्त्यावर सम व विषम तारखांना गाड्या उभ्या करण्यासाठी दोन तीन दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पत्रकारांना दिली.
 मुरबडच्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर वापरत असलेली शासकीय कार मुरबाड नगर पंचायत कार्यालयासमोर रस्त्यावर उभी करण्यात आली होती. ही बाब मनसे अध्यक्ष नरेश देसले यांना कळताच त्यांनी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना या गाडीचा दंड वसूल करण्यास सांगितले व नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर यांचे कडून 200 रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Penalties imposed on murbad mayor