उल्हासनगरात 21 व्यापाऱ्यांवर 1 लाख 10 हजरांची दंडात्मक कारवाई

दिनेश गोगी
शनिवार, 23 जून 2018

उल्हासनगर : आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी असताना दुकानात प्लॅस्टिकचा साठा ठेवणाऱ्या 21 व्यापाऱ्यांनावर उल्हासनगर महानगरपालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे 1 लाख 10 हजार रुपयांची दंडात्मक वसुलीची कारवाई केली आहे. त्यात विनोद चावला हे व्यापारी दोनदा सापडल्याने या व्यापाऱ्याला पावतीच्या रूपात 10 हजार रुपयांचा भुर्दंड बसला आहे.

उल्हासनगर : आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी असताना दुकानात प्लॅस्टिकचा साठा ठेवणाऱ्या 21 व्यापाऱ्यांनावर उल्हासनगर महानगरपालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे 1 लाख 10 हजार रुपयांची दंडात्मक वसुलीची कारवाई केली आहे. त्यात विनोद चावला हे व्यापारी दोनदा सापडल्याने या व्यापाऱ्याला पावतीच्या रूपात 10 हजार रुपयांचा भुर्दंड बसला आहे.

प्लॅस्टिक बंदी जाहीर झाल्याची जनजागृती संपूर्ण उल्हासनगरात करण्यात आली होती. पण तरीही कुणी पिशव्यांचा साठा ठेवला आहे काय याची शहानिशा करण्यासाठी पालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशान्वये मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी, एकनाथ पवार, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत, अजित गोवारी यांची चार पथके तैनात करण्यात आली होती. सकाळी 10 वाजल्यापासून दुकानांची झाडाझडती केली गेली असता 20 व्यापाऱ्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आढळून आल्यावर त्यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. पालिकेच्या कारवाईच्या भीतीने अनेक दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद ठेवली तर पथक येत असल्याचे समजताच दुकानांना बंद करण्यात येत होते. अशी माहिती विनोद केणे यांनी दिली.

"कारवाईसाठी गेलेल्या पथकाला नालेसफाईची विचारणा"

दरम्यान प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी हे बाजारपेठेत प्लॅस्टिकची झाडाझडती घेण्यासाठी गेले असता, थेतील व्यापाऱ्यांनी समतानी यांना नालेसफाई वरून घेरण्याचा प्रयत्न केला. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारी करत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ओरड केली.त्यावर प्लॅस्टिक बंदी आणि नालेसफाई हे भिन्न विषय आहेत. तीन दिवसांपूर्वीच प्रभाग 1 चा पदभार स्विकारला. तुम्ही सोमवारी प्रभागात या तक्रारीचे निवारण करून देण्यात येणार. असे आश्वासन नंदलाल समतानी यांनी दिल्यावर प्रकरण निवळले आणि पथकासोबत समतानी हे प्लॅस्टिक कारवाई साठी कामाला लागले.

महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिक पिशव्या बाळगताना एकदा सापडल्यास 5 हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा 10 हजार व तिसऱ्यांदा 25 हजार रुपये दंड निश्चित केला आहे. काही दिवसांपूर्वीच विशाल प्लॅस्टिकचे विनोद चावला यांच्यावर एकदा कारवाई झालेली आहे.तेंव्हा त्यांच्याकडून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता. आज त्यांच्याकडे पुन्हा साठा आढळून आल्याने त्यांच्याकडून 10 हजार रुपयांची पावती फाडण्यात आल्याचे विनोद केणे यांनी सांगितले. 
दरम्यान उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी, परमानंद गेरेजा यांनी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्लॅस्टिक बंदीला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, प्लॅस्टिकचा साठा ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

Web Title: Penalty action of 1 million 10 years for 21 merchants in Ulhasnagar