भारतात पहिल्यांदाच जन्मला पेंग्विन

भारतात पहिल्यांदाच जन्मला पेंग्विन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्यदिनी पंधरा अॉगस्ट रोजी सायंकाळी अाठ वाजून दोन मिनिटांनी हे पिल्लू अंड्यातून जन्माला अाले. मॉल्ट अाणि फ्लिपर या नर मादीची जोडी तयार झाल्यानंतर ५ जुलै रोजी फ्लिपर ने अंडे टाकल्याचे राणीबाग प्रशासनाच्या लक्षात अाले.

मुंबई : भायखळ्याच्या राणीबागेत स्वातंत्र्यदिनी पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म झाला. पिंजर्‍यात जन्मलेले हे देशातील पहिले पेंग्विन ठरले अाहे. 

स्वातंत्र्यदिनी पंधरा अॉगस्ट रोजी सायंकाळी अाठ वाजून दोन मिनिटांनी हे पिल्लू अंड्यातून जन्माला अाले. मॉल्ट अाणि फ्लिपर या नर मादीची जोडी तयार झाल्यानंतर ५ जुलै रोजी फ्लिपर ने अंडे टाकल्याचे राणीबाग प्रशासनाच्या लक्षात अाले. पेंग्विनचे अंडे चाळीस दिवसांनी फुटते. त्यानुसार १५ अॉगस्टलाच देशाला पिंजर्‍यात जन्मलेला पेंग्विन मिळणार असल्याचे राणीबाग प्रशासनाकडून जाहीर करण्यात अाले होते.

त्यानुसार राणीबागेतील डॉक्टर्सही अंड्याजवळ लक्ष ठेवून होते. दोघे नर-मादी अाळीपाळीने अंडे उगवण्याचा प्रयत्नही करत होते. अखेर चाळीस दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल पेंग्विनचा जन्म झाला. पिल्लू व्यवस्थित अाहे. अाई फ्लिपर पिल्लूला दूध पाजण्याचाही प्रयत्न करतेय, अशी माहिती राणीबागेचे संचालक डॉ संजय त्रिपाठी यांनी दिली. हे पिल्लू नर अाहे का मादी हे जन्मल्या नाही समजत. काही दिवसांनी पिल्लूचे लिंग समजेल, असेही ते म्हणाले.

Web Title: penguin birth in Mumbai