राणीबागेमध्ये ‘बबल’ एकाकी!

जोडीदाराच्या प्रतीक्षेत असलेले ‘बबल’.
जोडीदाराच्या प्रतीक्षेत असलेले ‘बबल’.

मुंबई - भायखळा येथील राणीच्या बागेत सध्या सात पेंग्विन आहेत. त्यातून तीन पेंिग्वनच्या जोड्या जमल्या आहेत. ‘बबल’ नावाचे मादी पेंग्विन मात्र अद्याप जोडीदाराच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तीन वर्षांचे बबल एकाकी जीवन जगत आहे.  भविष्यात राणीच्या बागेत आणखी पेंग्विन दाखल होण्याची शक्‍यता आहे. तेव्‍हाच बबलची ही प्रतीक्षा संपेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

२६ जुलैला दक्षिण कोरियातील क्वेस मत्स्यालयातून आठ पेंग्विन भायखळ्यातील राणीबागेत आणण्यात आले. या पेंग्विनना त्यांच्या कक्षात आणण्यापूर्वी वेगळे (कॉरनटाईनमध्ये) ठेवण्यात आले होते. त्या वेळी एक वर्षाच्या बबलची तिच्याच वयाच्या मॉल्टशी गट्टी जमली होती. हे दोघे लवकरच जोडीदार बनतील, असा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अंदाज होता. 
‘कॉरनटाईन’मध्ये पोपाय-ऑलिव्ह, डॉनल्ड-डेझी या जोड्या तयार झाल्या होत्या. उरलेल्या बबल व फ्लिपर यांच्यातून जोडीदार म्हणून मॉल्ट बबललाच निवडेल, हे जवळपास निश्‍चित होते; मात्र पेंग्विन कक्षात प्रवेश करताच मॉल्टने जोडीदार म्हणून वयाने मोठ्या असलेल्या ‘फ्लिपर’ची 
निवड केली. 

फ्लिपर आणि मॉल्ट या जोडीने 
५ जुलैला अंडे दिले. दोघेही अंडे उबवायला जात होते. फ्लिपर अंडी उबवायला गेली की, मॉल्ट इतर माद्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. त्या वेळी मॉल्टला फक्त बबलच प्रतिसाद द्यायची. ते दोघे कित्येक तास एकत्र पाण्यात विहारही करायचे. मात्र, पिलाच्या मृत्यूनंतर मॉल्टने आपली जोडीदार फ्लिपरकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

परदेशी प्राणी-पक्ष्यांच्या मूळ कृती आराखड्यात पहिल्या टप्प्यात १० आणि नंतरच्या टप्प्यात १० पेंग्विन पक्षी आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार भविष्यात अजून पेंग्विन पक्षी दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर बबलला जोडीदार मिळेल. तोपर्यंत जोडीदाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी आशा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

प्रणयसाद ऐकण्यासाठी व्‍याकूळ  
पेंग्विन कक्षात पोपाय-ऑलिव्ह, डोनल्ड-डेझी, मॉल्ट-फ्लिपरने आपापले घरटे निवडले आहे. या तिघांचा प्रणय सुरू झाला की बबल उदास होते, अशी माहिती पेंग्विनला सांभाळणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मधुमिता काळे यांनी दिली. प्रणयापूर्वी पेंग्विन जोडीदाराला बोलावण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा आवाज करतात, ही साद आपल्याला नाही याची बबलला जाणीव होते. त्या वेळी एकटेपणा तिला जाणवू लागतो. मात्र, वयाने लहान असल्याने तिला यापलीकडे फारसे समजत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com