पाच रुपयांत पेंग्विन दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई -  भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या हॅम्बोल्ट पेंग्विन कक्षाचे शुक्रवारी (ता.17) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. शनिवारपासून या कक्षातील पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी प्रौढ व्यक्तींना पाच रुपये तर मुलांना दोन रुपये मोजावे लागतील. पेंग्विन पाहाण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या तिकीटांचे पैसे त्यांच्या पालनपोषणासाठी वापरण्यात येणार आहेत, असे आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. 

दरम्यान, पेंग्विन कक्षात प्रवेश करण्यासाठी प्रौढ व्यक्तींसाठी शंभर तर लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मुंबई पालिका प्रशासन लवकरच पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडणार आहे. पेंग्विन दर्शनासाठी प्रौढांकडून दोनशे रुपये तिकिट आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पालिका निवडणुीपूर्वी गटनेत्यांपुढे मांडला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. 

पेंग्विन्सना देशी नावे हवीत 
या कक्षातील पेंग्विन्सना पालिकेने परदेशी नावे दिली आहेत. ती बदलून देशी नावे ठेवावीत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली आहे. त्यामुळे पेंग्विन्सवरून सुरू असलेले राजकरण अद्याप संपलेले नसल्याचे चित्र आहे. 

या कक्षाच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी मोठी गर्दी जमली होती. उद्‌घाटन केल्यानंतर उद्धव ठाकरे काही सेकंदच तेथे थांबले. ते बाहेर जातात कक्षातील दिवे बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. मात्र, भाषण केल्यानंतर ठाकरे पुन्हा या कक्षात आले. 

Web Title: Penguins appeared to Rs five