पेंग्विनचे दर्शन उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील सात हम्बोल्ट पेंग्विनचे दर्शन १७ मार्चपासून होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यानंतर मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन होणार आहे. ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जाणार असून, त्यानंतर पेंग्विनला पाहण्यासाठी शुल्क आकारले जाईल, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीपूर्वी राणीच्या बागेत झालेल्या पेंग्विनच्या मृत्यूनंतर राजकीय वादळ निर्माण झाले होते. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पेंग्विनचे दर्शन लांबले. निवडणुकीनंतर स्थायी समिती सदस्यांनी पाहणीही केली. त्यानंतर ६ मार्चला सकाळी सातही पेंग्विनना हलवण्यात आले. त्यामुळे मुंबई महापौर निवडीनंतर पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना होणार हे स्पष्ट झाले होते. पेंग्विनला वेगवेगळ्या नावांनी हाक मारली जाते. त्यामुळे त्यांना ओळखण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे लेबलही लावण्यात आल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: Penguins appeared from tomorrow