महेंद्र दळवींविरोधात जनआक्रोश

विधानभवन
विधानभवन

अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे.

दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यांच्याकडून विभागातील मतदारांकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु ते अपयशी ठरले असल्याने अलिबाग विधानसभा मतदार संघाचा काय विकास करणार, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

थळ मतदार सांघातील बहुसंख्य रस्ते खराब आहेत. त्यामध्ये थळपेठ-चाळमाळा, पाळथी-नवगाव, चाळमाळा, लोणारे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवरूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संताप आहे. पाण्याचा प्रश्‍नही बिकट आहे. थळ चाळमळा, थळ बाजार, थळ आगर, थळ, वायशेत, लोणारे आदी गावांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना उधाणाचा धोका त्यामुळे त्यांच्यामध्येही आक्रोश आहे. घरगुती हिंसाचार, हाणामारी अशा अनेक प्रकारचे गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल आहेत. 

थळ जिल्हा परिषद मतदारसंघात पाणी, रस्ता असे अनेक प्रश्‍न आहेत. महेंद्र दळवी हे कोणत्या अधिकाराने निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. दमदाटी करण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना मतदार जागा दाखवतील.
- चित्रलेखा पाटील, शेकाप

थळ ग्रामपंचायतीवर महेंद्र दळवी यांचे वर्चस्व आहे. कोणीही सरपंच असला, तरीही ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्याच हातात असतो. या गावातील पाणी, रस्ता, गटारांचा प्रश्‍न आजही प्रलंबित आहे. राज्यात, केंद्रात यांची सत्ता असतानाही थळचा विकास झाला नाही. त्यामुळे अलिबाग विधानसभा मतदार संघाचा विकास काय करणार असा प्रश्‍न आहे.
- सतीश म्हात्रे, ग्रामस्थ, थळ

थळमध्ये वेगवेगळ्या योजनेतूनच रस्त्याचे काम करण्यात आले आहे. नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात जिल्हा परिषद, आमदारकी असूनही जनतेची फार मोठी निराशा केली आहे. 
- महेंद्र दळवी, उमेदवार, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com