रसायानीसाठीच्या बस फेऱ्या कमी केल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजी

लक्ष्मण डुबे 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

रसायानी (रायगड) - परिसरात पनवेल एस टी आगाराच्या वतीने एस टी बसच्या फे-या चालविण्यात येत आहे. त्यापैकी काही एस टी बसच्या फे-या साधारण दहा दिवसापासुन बंद केल्याने या एस टी बसने पनवेल, नवीमुंबई तसेच मार्गावरील गावांकडे जाणा-या इतर प्रवांशाची गैरसोय होत असल्याने प्रवाशांन मध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. एस टी बसच्या फे-या पूर्ववत करण्यात याव्यात आशी मागणी प्रवाशांकडुन करण्यात आली आहे. 

पनवेल एस टी आगाराच्या वतीने दांड व सावळे मार्गे वाशिवली, वडगाव, जांभिवली, सवणे, आपटे आदि एस टी बसच्या फे-या चालविण्यात येत आहे. तर एस टी बसने वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, वडगाव, कराडे खुर्द, जांभिवली, चावणे, आपटे, गुळसुंदे, वावेघर, तुराडे, सावळे, पोसरी, आदि ग्रामपंचायतीच्या हद्दितील हजारो विद्यार्थी व कामगार व इतर प्रवाशी पनवेल, नवीमुंबई उपनगरात दर दिवस जातात. 

एस टी फे-यान पैकी दांड मार्गे सकाळी सात ते नऊ दरम्यान तीन एस टी बसच्या फे-या एस टी आगाराने बंद केल्या आहे. त्यामुळे नवीमुंबई, पनवेल आणि मार्गावरील गावांकडे जाणा-या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे. एस टी बस आभावी जाताना वेळ जास्त लागतो व आर्थिक भुर्दंड बसत आहे. एस टी पास काढुन मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे भास्कर रावळ यांनी सांगितले. तसेच सावळे मार्गे काही एस टी बंद केल्या असल्याचे ज्ञानेश्वर माळी यांनी सांगितले. दरम्यान एस टी बसच्या फे-या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात तसेच सर्व एस टी बस नियमित वेळेत सोडण्यात याव्यात आशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 

औद्योगिकरणामुळे परिसरातील गावांची लोकसंख्या वाढली आहे. परिसरातुन पनवेल व नवीमुंबई कडे जाणारे विद्यार्थी व कामगार प्रवास करताना एस टी बसवर आवलंबुन आहे. एस टी बस बंदमुळे विद्यार्थी, कामगार व इतर प्रवाशांचे हाल होत आहे.

Web Title: people are not satisfied due to Reducing the bus rounds