संतापजनक! PUBG खेळण्यास केला मज्जाव, अर्धनग्न होईपर्यंत महिलेला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पबजी गेम खेळण्यास मज्जाव केला म्हणून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना डोंबिवली शहरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्ध नग्न होईपर्यंत या महिलेला अमानुष मारहाण सुरूच होती. डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील विशाल भोईर इमारतीतील ही घटना आहे.

डोंबिवली : पबजी गेम खेळण्यास मज्जाव केला म्हणून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना डोंबिवली शहरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्ध नग्न होईपर्यंत या महिलेला अमानुष मारहाण सुरूच होती. डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील विशाल भोईर इमारतीतील ही घटना आहे.

पीडित महिलेनं पबजी खेळण्यास मज्जाव केला म्हणून शेजाऱ्याच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण केली. याप्रकरणी राम नगर पोलिस चौकशी करत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिन्यावर बसून पबजी खेळणाऱ्या काही तरुणांना पीडित महिलेनं मज्जाव केला. याचाच राग मनात ठेऊन तिच्या शेजारी राहणाऱ्या मीना कदम, मनिष कदम, मानसी कदम, गरिमा त्रिवेदी यांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होत की महिलेच्या अंगावरचे कपडेदेखील फाटले. तरीही या शेजाऱ्यांनी तिची दया आली नाही, त्यांची मारहाण सुरूच होती.  मारहाणीत दुखापत झाल्याने पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान,  ऑनलाइन गेम पबजीमुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं यावरून दिसत आहे. या गेमच्या वेडापायी काही जण घर राहतं सोडून जात आहेत तर काही जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. त्यातच ही घटना घडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people beaten woman brutally for opposing to play online game pubg in Dombivali