नागरिकांच्या जागरुकतेमुळे हरणाला जीवनदान                                    

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मुंबई  : बोरिवली नॅशनल पार्कजवळील कांदिवली जानूपाडा येथील नाल्यात बुधवारी (ता. १८) सकाळी जखमी अवस्थेत हरीण आढळले. येथील लक्ष्मी निवास चाळीतील रहिवासी नितीन वाळणेकर यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी वन विभाग अधिकाऱ्यांशी व प्राणिमित्र मिता मालवणकर यांच्याशी संपर्क साधला. तासाभराने प्राणिमित्र व वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी हरणाला ताब्यात घेतले. वैद्यकीय उपचारानंतर हरणाला त्याच्या कळपात सोडण्यात आले. रात्री हे हरीण कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते; मात्र जीव वाचविण्यासाठी हरणाने नाल्याचा आधार घेतला, अशी माहिती आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people save deer in boriwali