(VIDEO) ट्रेनमधल्या तळीरामांना पब्लिकने तुडवलं, जरा पहाच..    

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेमध्ये हरतऱ्हेचे प्रवासी पाहायला मिळतात. एकमेकांना सांभाळत लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र मुंबईच्या लोकलच्या प्रवाशांमधील हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

तळीरामांचं एक टोळकं लोकलमध्ये बसून, खुल्लेआम दारु पीत बसलं होतं. तसंच सहप्रवाशांवर त्यांची दादागिरीसुद्धा सुरू होती. यावेळी इतर प्रवाशांनी त्यांना शांत राहून, दारु पिण्यास मज्जाव केला. मात्र तळीरामांचा धिंगाणा काही थांबण्याची चिन्हं दिसत नव्हती.

अखेरीस इतर सहप्रवाशांचा स्वत:वरील संयम सुटला आणि त्यांनी या तळीरामांच्या टोळक्याला जन्माची अद्दल घडवली. सर्वांनीच या दादागिरी करणाऱ्या मद्यपींना चोप देत, लोकलमधून हाकलून लावलं.

मुंबईतील लोकलमध्ये अनेकवेळा प्रवाशांना अश्या तळीरामांचा सामना करावा लागतो. अशातच आता ही घटना समोर आल्यानंतर तळीरामांना दिलेला चोप योग्यच असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडिया मधून व्यक्त होतायत.

WebTitle : people thrashed group of drunk people in local train

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people thrashed group of drunk people in local train