esakal | क्वारंटाईनच्या भीतीने अँटीजन चाचणीस विरोध; चेंबूरमध्ये नागरिकांची अधिकाऱ्यांशी हुज्जत
sakal

बोलून बातमी शोधा

क्वारंटाईनच्या भीतीने अँटीजन चाचणीस विरोध; चेंबूरमध्ये नागरिकांची अधिकाऱ्यांशी हुज्जत

आम्हाला काहीही झालेले नाही. अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. तुम्हीच चाचणी करून 14 दिवस क्वारंटाईन होऊन दाखवा, अशी हुज्जत नागरिक घालत आहेत.

क्वारंटाईनच्या भीतीने अँटीजन चाचणीस विरोध; चेंबूरमध्ये नागरिकांची अधिकाऱ्यांशी हुज्जत

sakal_logo
By
जीवन तांबे

चेंबूर (बातमीदार) : रॅपिड अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यास क्वांरटाईन होण्याच्या भीतीने नागरिकच या चाचणीला विरोध करत असल्याचे समोर येत आहे. चेंबूरमधील झोपडपट्टी परिसरात पालिकेतर्फे रॅपिड अँटीजन चाचणी शिबीर घेण्यात येत आहे. यासाठी पालिका अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना चाचणी करून घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, नागरिक अधिकाऱ्यांना नकार देत असून काही ठिकाणी तर अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे.

पार्थ पवारांच्या 'सत्यमेव जयते' ट्विटवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात पार्थ यांनी....

एम पश्चिम आरोग्य विभागाच्या वतीने चेंबूरमधील मालेकरवाडीत मंगळवारी (ता. 18) अँटीजन चाचणी शिबिर घेण्यात आले. त्यास केवळ 30 ते 35 नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, आज घाटला परिसरातील दोन शिबिरांत केवळ 12 जणांनी चाचणी करून घेतली. याशिवाय ठक्कर बाप्पा कॉलनी, सुभाष नगर, माहुल, वाशीनाका या परिसरातही चाचणीसाठी नागरिकांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. 

तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु

पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना आवाहन करत आहेत. मात्र, आमची तब्येत बरी आहे. आम्हाला काहीही झालेले नाही. अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. तुम्हीच चाचणी करून 14 दिवस क्वारंटाईन होऊन दाखवा, अशी हुज्जत नागरिक घालत आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना अँटीजन चाचणी करिता नागरिकांची वाट पाहावी लागत आहे.

CBI सर्वात आधी 'या' गोष्टी घेणार स्वतःच्या ताब्यात, आजच किंवा उद्या CBI ची टीम मुंबईत होणार दाखल

नागरिकांना याची भीती

गेल्या चार महिन्यात अनेक क्वारंटाईन केंद्रात कोरोना रुग्णांना निकृष्ट जेवण मिळाल्याचे समोर आले आहे. रुग्णांना गरम पाणी मिळाले नाही. केंद्रात अस्वछता आणि कोणतीच सुविधा नव्हती. त्यामुळे कित्येकांचे हाल झाल्याचे नागरिकांचे म्हण्णे आहे. त्यात उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल्यास अव्वाच्या सव्वा बील येण्याची भीतीही नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिक अँटीजन चाचणीस विरोध करत आहेत. 

चेंबूरमधील स्थिती
चेंबूर एम पश्चिम विभागात आतापर्यंत 3500हून अधिक कोरोना रुग्ण आढळले अशून 297 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2590 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पी.एल लोखंडे मार्गावर 314 हून अधिक कोरोना रुग्ण असून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 248 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मुदत वाढली; आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घ्या


 
चेंबूरमधील पीएल लोखंडे मार्गावर कोरोना रुग्णाची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता अँटीजन चाचणी करून घ्यावी. कोणतीही भीती मनात बाळगू नये. या करिता पालिकेच्या आरोग्य विभागाला सहकार्य करा.
- संगीता हंडोरे, स्थानिक नगरसेविका

गणेशोत्सव जवळ आल्याने नागरिक आमची प्रतिकारक शक्ती चांगली असल्याचे कारण देत चाचणीस नकार देत आहेत. कारण पॉझिटिव्ह आल्यास ऐन सणासुदीत त्यांना क्वारंटाईन करतील, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. माझ्या विभागात दोन शिबीर घेतले. त्यात फक्त 12 ते 14 लोकांनी अँटीजन चाचणी करून घेतली.
- अनिल पाटणकर, नगरसेवक व बेस्ट अध्यक्ष 

---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top