esakal | पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण 35 वरून 18 टक्के, रुग्णांची संख्या निम्म्याने घटली
sakal

बोलून बातमी शोधा

पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण 35 वरून 18 टक्के, रुग्णांची संख्या निम्म्याने घटली

कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असल्या तरी चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 35 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर खाली आले आहे.

पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण 35 वरून 18 टक्के, रुग्णांची संख्या निम्म्याने घटली

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असल्या तरी चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 35 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर खाली आले आहे. पालिकेने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्यास मदत मिळत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंबईत महिन्याभरापूर्वी  दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण चार ते साडेचार हजार होते. यामध्ये एक हजार ते दीड हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. मात्र आता चाचण्यांचे प्रमाण दहा हजारांवर गेले असताना देखील सुमारे 2000 हजार ते 2200 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. पालिकेच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवताना घरोघरी तपासणी, सर्वेक्षण यामध्ये बहूतांश रुग्ण आणि अतिजोखमीच्या संपर्कांचा शोधू घेतला जात आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते.

अधिक वाचाः  मुसळधार पावसामुळे पनवेल परिसरातील जनजीवन विस्कळीत; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

ट्रेस कॉन्टँक्टच्या माध्यमातून पालिका प्रशसासन अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर देतेय. शहरात 20 सप्टेंबरपर्यंत 10 लाख 4 हजार 17 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 लाख 84 हजार 313 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मात्र यातील 1 लाख 47 हजार 807 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत 27 हजार 664 सक्रिय रुग्ण आहेत.  

हेही वाचाः  रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती आता मिळणार फक्त एका कॉलवर

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत असले तरी त्यातील 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून एनएससीआय वरळी डोम, रिचर्डसन क्रुडास भायखळा, महालक्षमी, बीकेसी, गोरेगाव, दहिसर चेकनाका, दहिसर कांदरपाडा या ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये सुमारे पाचशे खाटा वाढवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

----------------

(संपादनः पूजा विचारे) 

Percentage positive tests Decreased from 35 to 18 percent

loading image