15 लाख जमा करून मायदेशी जाण्याची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - परदेशी नागरिकाला सुरक्षा ठेव म्हणून 15 लाख जमा करून मायदेशी जाण्याची परवानगी देत असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. स्टीफन स्मिथ (वय 62) असे त्याचे नाव आहे. ब्रिटनचा नागरिक असलेल्या स्मिथ याने मुलीच्या लग्नासाठी आपल्या देशात जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. त्याच्यावर विमानतळावरून लॅपटॉप चोरी केल्याबाबत सहार पोलिस ठाण्यात "एफआयआर' दाखल आहे.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लॅपटॉपची बॅग चोरीला गेल्याची तक्रार 16 डिसेंबरला खार येथील सुनील भोलाभाई यांनी पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर स्टिफन याला गोव्यातून अटक करण्यात आली होती. तो आणि त्याची पत्नी येथे पर्यटनासाठी आले होते. ते दोघे मुंबईवरून गोव्याला गेले होते. विमानतळावरून सामानात चुकीने ही बॅग आल्याचे स्मिथ याचे म्हणणे आहे. स्मिथ यांनी याप्रकरणी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका खंडपीठाकडे केली होती. तसेच 3 मार्चला मुलीचे लग्न असल्याने मायदेशी जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही केली होती. न्या. अभय ओक आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. 15 लाख सुरक्षा ठेव ठेवून मायदेशी जाण्याची परवानगी दिली; मात्र 2 एप्रिलला पुन्हा भारतात परतून अंधेरीच्या दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Permission to go home by collecting 15 million