कोण आहे 'हा' अवलिया, जो थेट ब्राझीलवरून आला मतदानासाठी..

कोण आहे 'हा' अवलिया, जो थेट ब्राझीलवरून आला मतदानासाठी..

ऊन, वारा, पाऊस, वाहतूक कोंडी अशी विविध कारणं देऊन मतदान करायला आळस करणारे अनेक जण भेटतील. पण मतदानासाठी ब्राझील वरून थेट मुंबईत येणारा एक अवलिया दक्ष नागरिक देखील चर्चेचा विषय ठरला आहे.धिरेन मोरे असं या अवलियाचं नाव असून जो खास मतदानासाठी मुंबईत दाखल झाला.

धिरेन मोरे ,वय 49 हे मूळचे रायगडमधील महाड तालुक्यातील असून त्यांचे कुटुंबीय गेली दोन पिढ्या दादर मधील हिंदमाता परिसरात राहतात.धिरेन यांचा स्वतःचा व्यवसाय असून व्यवसायानिमित्त ते 1998 साला पासून ब्राझील देशात राहतात.आपल्या कामानिमित्त ते जगभर फिरत असतात.अस असलं तरी त्यांची मुंबईशी असणारी नाळ मात्र तुटलेली नाही. मुंबईत जेव्हा कधी निवडणुका असतात तेव्हा ते काहीही करून मुंबईत येतात आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतात.

धिरेन मोरे 2000 साला पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीतील मतदानासाठी हजर असतात.ते कामानिमित्त जरी जगभर फिरत असले तरी निवडणुकीच्या वेळी मुंबईत येण्याची योजना ते आखातात. मुंबईत महानगरपालिका,लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक असो ते मतदानासाठी आवर्जून उपस्थित असतात.यापल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते ब्राझील ते मुंबई असा 14 हजार किलोमीटरचा 24 तासांचा प्रवास अगदी आनंदाने करतात.यासाठी तिकीटाला लागणारे लाखो रुपये खर्च करण्याची ही त्यांची तयारी असते.मतदानासाठी आतापर्यंत ते 12 ते 15 वेळा मुंबईत येऊन गेले आहेत.

धिरेन मोरे दादर मधील हिंदमाता परिसरात राहणारे असून  वडाळा मतदारसंघात ते मतदान करतात. सोमवारी ही त्यांनी अगदी आनंदाने मतदान केले. मी जरी जगभर फिरत असलो तरी माझी नाळ ही महाराष्ट्राशी खास करून मुंबईशी जुळलेली आहे. यामुळे इथे बनणाऱ्या सरकारमध्ये आपलं ही योगदान असावं अस धिरेन मोरेंना वाटतं.मतदान ही केवळ आपली जबाबदारीच नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेतून आपण दरवेळी आवर्जून मतदान करत असल्याचे धिरेन मोरेंनी सांगितलं.

WebTitle : person came from brazil just to cast his vote

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com