आजीच्या अंत्ययात्रेला जाताना तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नागोठणे : आजीच्या अंत्ययात्रेसाठी मंडणगडला निघालेल्या तुषार दत्ताराम धाडवे (22) याचा अपघातात शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.

तुषार दुचाकीवरून मुंबईहून मंडणगडकडे निघाला होता. नागोठण्याजवळ पाटणसई गावाच्या हद्दीत पहाटे पावणेचारच्या सुमारास टेंपोची दुचाकीला धडक बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले सुरेंद्र श्रीराम किंजले (30) गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेंपोसह चालक पसार झाला.

Web Title: person going to granny's funeral dies in accident

टॅग्स