"स्पर्धा परिक्षेतून व्यक्तिमत्त्वाचा विकास'; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

"स्पर्धा परिक्षेतून व्यक्तिमत्त्वाचा विकास'; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

ठाणे  : विद्या प्रसारक मंडळाचे के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, ठाणे यांच्यावतीने नुकतेच डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून माजी सनदी अधिकारी धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एमपीएससी आणि युपीएससी यांच्यासोबतच इतर क्षेत्रातील स्पर्धा परिक्षांविषयी यावेळी त्यांनी माहिती दिली. प्रत्येक परीक्षेत असणारे साम्य, मुलाखतीच्या वेळी कशी उत्तरे द्यावी, आपल्या व्यक्तिमत्वाचे सादरीकरण कसे असावे आणि आत्मविश्वास याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परिक्षा दिल्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. स्पर्धा परिक्षेचे पाच पंचशील शब्द असून त्यातील पाहिला शब्द म्हणजे प्रामाणिक आणि चांगल्या मार्गाने आलेले पैसे, दुसरा शब्द म्हणजे सुरक्षितता, तिसरा शब्द म्हणजे सन्मान, चौथा शब्द म्हणजे सत्ता आणि पाचवा म्हणजे देशसेवा. हजारोंचा जनसमुदाय जे काम करु शकत नाही ते एका अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने साध्य होऊ शकते.

एवढी या पदांची ताकद असल्याचेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मानसी जंगम, प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक, उपप्राचार्य डॉ. महेश पाटील यांसह अनेक शिक्षक उपस्थित होते.

--------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Personality development through competitive examination Avinash Dharmadhikaris statement in Dr Bedekar Smriti Lecture Series thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com