आता "पेट' परीक्षेतही 70+30 

आता "पेट' परीक्षेतही 70+30 

मुंबई -  मुंबई विद्यापीठाने डिसेंबरमध्ये घेतलेल्या 100 गुणांच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेत (पेट) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अधिसूचनेचे पालन केले नव्हते. या अधिसूचनेचे पालन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केली होती. त्यानुसार विद्यापीठाने सुधारित परिपत्रक जारी केले असून, 70 गुणांची लेखी आणि 30 गुणांची तोंडी या पद्धतीने "पेट' परीक्षा घेतली जाणार आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादीही याच पद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. 

पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना "पेट' परीक्षा द्यावी लागते. डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेली "पेट' लेखी परीक्षा 100 गुणांची होती. त्यात तोंडी परीक्षेच्या (व्होस व्हायवा) गुणांचा समावेश नव्हता. यूजीसीने 16 ऑक्‍टोबर 2018 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार "पेट' परीक्षा लेखीसाठी 70 आणि तोंडीसाठी 30 अशा एकूण 100 गुणांची घेणे आवश्‍यक आहे. 

मुंबई विद्यापीठाने या अधिसूचनेचे पालन न केल्यामुळे सुमारे 5000 विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, असा आरोप मनविसेने केला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मनविसेचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी मुंबई विद्यापीठाला पत्र देऊन यूजीसीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने "पेट' परीक्षेसाठी यूजीसीच्या अधिसूचनेचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही परीक्षा 70 गुण लेखी आणि 30 गुण या पद्धतीने होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com