पिटर, इंद्राणी मुखर्जी घटस्फोट घेणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याने पत्नी इंद्राणीला परस्पर सहमतीने घटस्फोट देण्यास तयार असल्याचे कळवले आहे. पीटर आणि इंद्राणी सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. पीटरने इंद्राणीच्या वकिलांना घटस्फोटासाठी तयार असल्याचे कळवले आहे. एप्रिलमध्ये इंद्राणीने पीटरला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. दोघांतील नाते पुन्हा कधीही जुळण्याच्या पलीकडे गेले आहे, असे इंद्राणीने नोटिशीत म्हटले होते.
Web Title: peter mukerjea and indrani mukherjee divorse

टॅग्स