आत्मचरित्र लिहिण्यासाठी पीटरला हवाय लॅपटॉप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी याला आत्मचरित्र लिहायचे आहे. त्यासाठी लॅपटॉप द्यावा, अशी मागणी त्याने न्यायालयात केली. काही दिवसांपासून आपण या नोंदी कागदांवर करत आहोत; पण याचा त्रास होत असल्याने दिवसातून फक्त चार तास इंटरनेट कनेक्‍शन नसलेला लॅपटॉप द्यावा. इतर वेळी तो तुरुंग प्रशासनाने स्वत:च्या ताब्यात ठेवावा, अशी मागणी त्याने अर्जाद्वारे केली आहे.

आठ आठवड्यांपेक्षा जास्त काळ या लॅपटॉपची गरजही लागणार नाही, तो पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन केला जाईल, असे त्याने अर्जात म्हटले आहे. 61 वर्षांचा वृद्ध असल्याने आपल्याला स्मृतिभ्रंशाचा त्रास जाणवत असून, या आठवणी संगणकात लिहून ठेवल्यास लिखाणास मदत होईल, असा दावा त्याने केला आहे. लॅपटॉप देणे शक्‍य नसल्यास इलेक्‍ट्रॉनिक टाइपरायटर द्यावा, तो देणेही शक्‍य नसेल, तर निदान तुरुंगाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून त्यांच्या परवानगीने हे लिखाण करता येईल, असे त्याने न्यायालयात सांगितले.

मंगळवार आणि शनिवारी उपवास असल्यामुळे या दिवशी तुरुंगात सुकामेवा आणि उपवासाचे पदार्थ द्यावेत, शेव्हिंग किटही मिळावे, असे त्याने अर्जात म्हटले आहे. बहिणीच्या मुलीचे कन्यादान करायचे असल्याने बंगळूरला जाण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, असा आणखी एक अर्ज त्याने न्यायालयाकडे केला आहे.

सीबीआयच्या वकील कविता पाटील यांनी पीटरच्या अर्जाला विरोध केला. पीटरच्या तीन अर्जांवर सीबीआयने पुढील आठवड्यात लेखी उत्तर द्यावे, असे न्यायालयाने सांगितले आहे.

Web Title: Peter want to write autobiography laptop