संप मागे घेण्याबाबत न्यायालयात याचिका

संप मागे घेण्याबाबत न्यायालयात याचिका

मुंबई : "बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संपकरी कामगारांना आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत दत्ता माने या वकिलाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्या. एन. एम. जामदार यांच्या पीठासमोर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

विविध मागण्यांसाठी तीन दिवसांपासून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे "बेस्ट'ची सेवा ठप्प पडली आहे. कर्मचारी संघटना आणि प्रशासनादरम्यान बैठका होऊनही अद्याप तोडगा निघालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली. मुख्य प्रतिवाद्यांनी एक समिती नेमून या प्रश्‍नी चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. 

या संपामुळे "बेस्ट'चे मोठे नुकसान झाले आहे. "बेस्ट' प्रशासनाच्या याचिकेवर सुनावणी करताना औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आदेश 7 जानेवारीला दिले होते. त्यानंतरही 8 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हा बेमुदत संप पुकारण्यात आल्याचे या याचिकेत नमूद आहे. 

सर्वसामान्यांचे हाल ! 

या संपामुळे "बेस्ट'च्या सुमारे 3700 बस रस्त्यावर धावल्या नाहीत. यामुळे रोज 50 लाख बस प्रवाशांचे हाल होत आहेत. संपाबाबत यापूर्वीही उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत ताकीद दिली होती. त्यानंतरही पुकारण्यात आलेल्या या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे, असेही या याचिकेत नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com