शिवस्मारकाविरोधात जनहित याचिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. सरकारी तिजोरीवर कर्जाचा डोंगर असताना या आर्थिकदृष्ट्या खर्चिक प्रकल्पाबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहे.

दक्षिण मुंबईतील प्रा. मोहन भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत राज्यावरील कर्जाची आकडेवारी आणि प्रकल्पावरील खर्चाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शिवस्मारकासारखा खर्चिक प्रकल्प उभारण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले-गडांचे संवर्धन करावे, अशी मागणी याचिकादाराने राज्य सरकारकडे केली आहे. शिवनेरीसह अनेक गडांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत विचार करावा, असे याचिकेत म्हटले आहे. यावर लवकरच नियमित सुनावणी होणार आहे.

Web Title: petition oppose to shivsmarak