मुंबईत पेट्रोल 85 रुपयांवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - देशभरात इंधन दरवाढीचा आगडोंब उसळला असून, गुरुवारी मुंबईत पेट्रोलने 85 रुपयांची पातळी ओलांडली. शहरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटरला 30 पैशांची वाढ होऊन तो 85.29 रुपयांवर गेला.

मुंबई - देशभरात इंधन दरवाढीचा आगडोंब उसळला असून, गुरुवारी मुंबईत पेट्रोलने 85 रुपयांची पातळी ओलांडली. शहरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटरला 30 पैशांची वाढ होऊन तो 85.29 रुपयांवर गेला.

इंधन दरवाढीने बाजारात पेट्रोल आणि डिझेल दररोज दराचा नवा उच्चांक प्रस्थापित करत असून, लवकरच पेट्रोल 90 रुपयांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिझेलचा भाव आज प्रतिलिटर 72.96 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 79 डॉलरच्या आसपास आहे. मात्र रुपयातील अवमूल्यनाने तेलाची आयात खर्चिक केली आहे.

इंधन दरवाढीने केंद्र सरकारची झोप उडाली असून, इंधनावरील उत्पादन शुल्क कपात आणि वस्तू व सेवा करात (जीएसटी) समावेश करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 77.47 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 68.53 रुपये होता. चेन्नईत पेट्रोल प्रतिलिटर 80.42 आणि डिझेल प्रतिलिटर 72.35 रुपये होते. कोलकत्यात पेट्रोल प्रतिलिटर 80.12 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 71.08 रुपये होते.

Web Title: petrol @85 Rupees