पेट्रोल पेटले, डिझेल भडकले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केल्यानंतर इंधनांच्या किमतींमध्ये दररोज चढ-उतार होत आहेत. मुंबईत जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. मुंबईत रविवारी (ता. 1) पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 81 रुपये 59 पैशांपर्यंत पोचला. डिझेलचा दर 68 रुपये 67 रुपये होता. चार वर्षांतील इंधन दराचा हा उच्चांक आहे. यापूर्वी 22 जानेवारीला मुंबईत पेट्रोल दराने प्रतिलिटरला 80 रुपयांची पातळी ओलांडली होती. 

तेल वितरक कंपन्यांच्या माध्यमातून इंधनाची दर दररोज निश्‍चित केले जात आहेत. गेल्या तीन दिवसांत इंधन दरांमध्ये वाढ झाल्याचे मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वेंकट राव यांनी सांगितले. सोमवारी (ता. 2) मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 81 रुपये 69 पैशांपर्यंत वाढेल आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 68 रुपये 67 पैसे राहील, अशी माहिती त्यांनी दिली. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (रुपयांमध्ये) 
दिनांक पेट्रोल डिझेल 
30 मार्च 81.17 68.30 
31 मार्च 81.41 68.58 
1 एप्रिल 81.59 68.67 
2 एप्रिल 81.69 68.69 
मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशन 

Web Title: Petrol diesel rate increase