'फोटोग्राफर ते मुख्यमंत्री', उद्धव ठाकरेंचा थक्क करणारा प्रवास

मयुरेश कडव
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे उत्तम  व्यंगचित्रकार आणि फोटोग्राफर असल्यानं उद्धव ठाकरेंना घरातूनच फोटोग्राफीचं बाळकडू मिळालं.

उद्धव ठाकरेंच्या रूपात एक हरहुन्नरी राजकारणी महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभणार आहे. फोटोग्राफी हा त्यांचा छंद. कधी विठूरायाच्या वारीची फोटोग्राफी तर कधी गडकिल्ल्यांची सैर. फोटोग्राफर ते मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा प्रवास थक्क करणारा आहे. 

कुणालाही भुरळ घालतील असे हे फोटो. निसर्ग आणि माणसांची ही गोड छबी कॅमेऱ्यात टिपलीय उद्धव ठाकरे यांनी.

Image may contain: mountain, outdoor and nature

 

शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे उत्तम  व्यंगचित्रकार आणि फोटोग्राफर असल्यानं उद्धव ठाकरेंना घरातूनच फोटोग्राफीचं बाळकडू मिळालं.

 

Image may contain: 2 people

 

बालमोहन विद्या मंदिरातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून फोटोग्राफीचे धडे गिरवले आणि तिथूनच सुरू झाला फोटोग्राफर उद्धव ठाकरेंचा प्रवास. 

निसर्गाची फोटोग्राफी हा त्यांचा खास छंद. मग महाराष्ट्रातील गडकिल्ले असोत वा पंढरीची वारी. उद्धव ठाकरेंचा कॅमेरा जिवंत चित्र उभं करतो.

 

Image may contain: mountain, sky, outdoor and nature

 

Image may contain: mountain, outdoor and nature

 

पाहावा विठ्ठल आणि महाराष्ट्र देशा ही त्यांची दोन पुस्तकं त्यांच्या कलागुणांची साक्ष देतात. केवळ महाराष्ट्रातच नाही तर उद्धव ठाकरेंनी परदेशातही आपल्या फोटोग्राफीची चुणूक दाखवून दिलीय. 2008 मध्ये इन्फ्रारेड तंत्राचा वापर करत कॅनडातल्या हडसन बे मध्ये जवळपास शून्य अंश तापमानात त्यांनी पोलर बियरचा फोटो काढला. फोटोग्राफीमुळे राजकारणातील ताणतणाव दूर होतो असं उद्धव ठाकरे सांगतात 

असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व एकाएकी महाराष्ट्राच्या राजकारणात आलेलं नाही. यामागे आहे पूर्वाश्रमीची कठोर मेहनत..बाळासाहेबांकडून मिळालेले कला आणि राजकारणाचे धडे...आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सच्च्या शिवसैनिकाची ताकद..कलेच्या प्रातांत मुक्तपणे मुशाफिरी करत तितक्यात ताकदीनं राजकारणाची कास धरणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर न्यावं हीच अपेक्षा.

Web Title : from photographer to maharashtras chief minister journey of uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From photographer to maharashtras chief minister journey of uddhav thackeray