टाटा मुख्यालयाबाहेर छायाचित्रकारांना मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

मुंबई - टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेले सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या मुख्यालयाबाहेर छबी टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या छायाचित्रकारांना तेथील दोन सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.

टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स लिमिटेडच्या तिमाही निकालाबाबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मिस्त्री शुक्रवारी दुपारी फोर्ट परिसरात टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या "बॉम्बे हाउस' येथे आले होते. त्यांची छबी टिपण्यावरून सुरक्षारक्षक आणि छायाचित्रकार यांच्यात वाद झाला. यातील काही सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकार अतुल कांबळे, अर्जित सेन यांना मारहाण केली. यात छायाचित्रकार एस. एल. संतकुमारदेखील जखमी झाले. या झटापटीत जखमी झालेले चार सुरक्षारक्षक आणि तीन छायाचित्रकारांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर "बॉम्बे हाउस'बाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

टाटा सन्सकडून दिलगिरी
"बॉम्बे हाउस'बाहेर सुरक्षारक्षक आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या मारहाणीबाबत टाटा सन्सने दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांची माफी मागत असून, पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे समूहाने म्हटले आहे.

सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल
बॉम्बे हाऊस बाहेर झालेल्या मारहाणीप्रकरणी अज्ञात सहा ते सात जणांविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Photographers assaulted Tata headoffice