घाटकोपर-मानखुर्द मार्गावर पिलर कोसळला ; वाहतुकीवर परिणाम

वृत्तसंस्था
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द मार्गावरील असलेला पिलर आज (शनिवार) कोसळला. मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवरील शिवाजीनगर सिग्नलजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक कार आणि दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेनंतर वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

घाटकोपर-मानखुर्द मार्गावर शिवाजीनगर सिंग्नलजवळ सांयकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. या भागात लोखंडी पुलाचे बांधकाम सुरू होते. त्यादरम्यान हा पिलर कोसळला. याबांधकामावेळी कंत्राटदाराकडून आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दुर्घटनेत एक चारचाकी वाहन आणि दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. 

या दुर्घटनेनंतर नवी मुंबईकडे आणि नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावर असलेले लोखंडी गर्डर काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून, गर्डर हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आली. 

Web Title: Pillar collapses on Ghatkopar Mankhurd Road