मोठी बातमी : आजचा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला

सुमित बागुल
Friday, 18 September 2020

आजचा नियोजित कार्यक्रम का पुढे ढकलण्यात आला याबाबतचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मुंबई : आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते मुंबईतील दादर भागातील इंदू मिल कंपाउंडवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज पार पडणार होता. मात्र आज पार पडणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरून अनेक नेत्यांना आमंत्रण नसल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. सकाळपासूनच हे नाराजीनाट्य पाहायला मिळत होतं.

या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर येतेय. आज पार पडणारा  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम  स्थगित करण्यात आलाय. 

महत्त्वाची बातमी : लालपरी निघाली, ST सेवा पूर्ण क्षमतेने सुरु; मात्र प्रवासासाठीचे महत्त्वाचे नियम आधी जाणून घ्या
 

 

आजचा नियोजित कार्यक्रम का पुढे ढकलण्यात आला याबाबतचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या सर्व प्रकारात विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. आनंदराज आंबेडकर यांना देखील आज आमंत्रण मिळालेलं. प्रकाश आंबेडकरांना यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.

महत्त्वाची बातमी : आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट, कलम १४४ लागू झाल्यानंतर म्हणालेत घाबरू नका

राज्यातील सर्वांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळेच आज सकाळपासून कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून जो गोंधळ झालेला होता, त्याला पाहता आजचा पायाभरणीचा कार्यक्रम आता स्थगित करण्यात आला आहे. याबाबत समोर येणाऱ्या माहितीनुसार MMRDA या कार्यक्रमाच्या बाबतीतील पुढील तारखा लवकरच जाहीर करणार असल्याचीही माहिती समोर येतेय. 

pilling work foundation of statue babasaheb ambedkar memorial postponed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pilling work foundation of statue babasaheb ambedkar memorial postponed