अबब! एक खड्डा 17 हजार रुपयांचा

अबब! एक खड्डा 17 हजार रुपयांचा

मुंबई: मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. गेल्या वर्षीसारखीच यंदाही रस्त्याची दुर्दशा झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दूरूस्ती होत नाही. खडड्यांवर कोल्डमिक्‍सचा उतारा असला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. यंदाच्या पावसाळ्यात 2 हजार 648 खड्डे पडले असून त्यापैकी 414 खड्डे उरले आहेत. गेल्या दोन वर्षांत 8 हजार 879 खेड्डे बुजविण्यासाठी 15 कोटी 71 लाख रुपये खर्च आला त्यामुळे एक खड्डा 17 हजार रुपयांना पडला असल्याची माहिती हाती आली आहे. 

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही दरवर्षी रस्ते खड्डेमय होऊन नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. यंदा 10 जून ते 1 ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील 2648, खड्डयांपैकी 2334, खड्डे बुजवले असून फक्त 414 खड्डे बाकी आहेत, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. तसेच पालिकेने 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षात तब्बल 8879, खड्डे बुजविण्यासाठी 15 कोटी 71लाख 29 हजार रुपये खर्च केले. त्यामुळे एका खड्ड्यावर तब्बल 17 हजार रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. हे खड्डे बुजवण्यासाठीही कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. सन 2013 ते 31 जुलै 2019 पर्यंत मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या एकूण 24146 ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 23388 खड्डे भरल्याचा दावा केला आहे. तसेच 2013 ते2019 या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण 175 कोटी 51 लाख 86 हजार तरतूद निधींपैकी आतापर्यंत 113 कोटी 84 लाख 77 हजार रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली. यंदा 10 जून ते 1 ऑगस्ट पर्यंत 2648 खड्ड्यांपैकी 2334 खड्डे भरले असून केवळ 414 खड्डेच शिल्लक आहेत, असा दावाही पालिकेने केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com