कचरा कमी करण्यासाठी नियोजन करा : अजोय मेहता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मुंबई : मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या नऊ हजार 500 टन कचऱ्याचे प्रमाण सात हजार 200 वर आले आहे. हे प्रमाण आणखी खाली आणण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खात्याने मायक्रो प्लानिंग करावे. त्याबाबत परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याला दिले. 

पालिकेच्या सर्व चोवीस विभाग कार्यालयांमध्ये कचरा कमी करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी मुंबईत दररोज सरासरी नऊ हजार 500 टन कचरा निर्माण होत होता. आता निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण सात हजार 200 टनांपर्यंत खाली आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याने दिली आहे. हे प्रमाण आणखी खाली आणण्याच्या दृष्टीने जनजागृतीसह प्रयत्नांची व्याप्ती वाढविण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने मायक्रो प्लानिंग करावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Plan to reduce waste says Ajoy Mehta

टॅग्स