पहिल्या पावसाचा आनंद लुटन्याचा प्लॅन करताय? जरा थांबा! 'या' ठिकाणांवर पर्यटनास बंदी

पहिल्या पावसाचा आनंद लुटन्याचा प्लॅन करताय? जरा थांबा!  'या' ठिकाणांवर पर्यटनास बंदी


सरळगाव: मुरबाड तालुक्यातील 13 पर्यटन स्थळांवर पर्यटकांना मौज- मजा करण्यास बंदी असल्याचे आदेश  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

पावसाळा सुरू होताच मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आदी शहरातुन पर्यटकांची पावले आपोआप मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील धबधब्या बरोबरच तालुक्यातील इतर पर्यटन स्थळांवर वळण्यास सुरुवात होते. निसर्गरम्य माळशेज घाटात शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावत असतात. यात हौसे,नवसे व गौसे यांचा समावेश असतो. असंख्य पर्यटक धबधब्याखाली ओलेचिंब होण्यासाठी तर काही पर्यटक या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात.

अशावेळी अती उत्साही पर्यटकांच्या संख्येत  वाढ झाल्यास दुर्घटनाही वाढतात. सध्या देशात कोरोनाचे थैमान पाहता खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड तालुक्यातील सिध्दगड,डोंगरन्हावे,सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्र गड,बारवीधरण परीसर, पाडाळे डॅम, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळु,खोपवली,गोरखगड,सिंगापुर नानेघाट, आंबेटेंबे मुरबाड.धसई डॅम या  पर्यटन स्थळांवर एक किलोमीटर परिसरात कोणतेही वाहन थांबविण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी कोण्याही पर्यंटकास भ्रमंती करण्यास परवानगी नसल्याचे जिल्हाधिकांऱ्यांनी नमुद केले आहे. संबधित आदेश पुढील सुचना येईपर्यंत सुरू राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com