खारघरमध्ये सिडकोचे रेल्वे स्थानकावर पार्कींगचे नियोजन चुकले 

गजानन चव्हाण
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सच्या धर्तीवर सिडकोने खारघर परिसरातील सेन्ट्रल पार्क समोरील जागेवर कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

खारघर - खारघर रेल्वे स्थानकावर वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडत असून सिडकोने वेळीच उपाय योजना करावी अन्यथा भविष्यात स्थानकावरील वाहनतळाचा प्रश्न गंभीर निर्माण होवू शकतो.
       
मुंबईवरील ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाने 17 मार्च 1970 साली   सिडको नावाचे महामंडळ स्थापन केले.1970 ते 1980 च्या काळात राज्य शासनाने मानखुर्द–वाशी खाडी पूल उभारला आणि नवी मुंबई शहराची निर्मितीला सुरवात झाली. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, नेरूळ आणि सीबीडी पाठोपाठ खारघर शहाराची निर्मिती केली. खारघर रेल्वे स्थानक उभे करताना सिडकोने स्थानकावर चार हजार वाहने उभे करता येतील, हे दूर दृष्टीकोन ठेवून वाहनतळ उभारले. स्थानकावर वाहनतळ असलेले महाराष्ट्रातील हे पहिले स्थानक म्हणून खारघरचे नाव पुढे आले.
खारघरची लोकसंख्या तीन लाखाहून अधिक आहे. सिडकोने खारघर मध्ये निर्माण केलेल्या चाळीस सेक्टर पैकी अजून पाच सेक्टरचा विकास प्रगतीपथावर आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्येत वाढ होऊ शकते. सिडकोने स्थानकावर चार हजार वाहनासाठी वाहन तळ उभारले आहे. सध्या जवळपास तीन हजार पाचशे दुचाकी वाहने तर तीनशे चार चाकी वाहने उभी केली जात आहे. स्थानकावर जागा कमी पडत असल्यामुळे चारचाकी वाहन चालक स्थानकावर जाणाऱ्या रस्त्याचा कडेला वाहने उभी करीत आहे.स्थानकावरील जागा अपुरी पडू लागल्याने दोन वर्षापासून स्थानकाच्या समोरील दोन्ही बाजूस असलेल्या रिक्षास्थळ समोरील जागेची निवड करून वाहनतळाची निर्मिती केली. तरीही वाहनतळासाठी जागा कमी पडू लागल्याने भविष्यात स्थानकावर वाहनतळाची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे सिडको समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
 
मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सच्या धर्तीवर सिडकोने खारघर परिसरातील सेन्ट्रल पार्क समोरील जागेवर कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्क शेकडो लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासी  संख्येची वाढ होणार आहे.त्यामुळे भविष्यात खारघर स्थानकावरील वाहनतळावर वाहने उभी करण्याचा प्रश्न गभीर होणार असून सिडकोने वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

सिडकोचा नियोजन चुकला 
सिडकोने वाशी, सानपाडा, बेलापूर प्रमाणे स्थानकाच्या बाहेर वाहनतळसाठी जागा सोडणे आवश्यक होते. मात्र सिडकोने खारघर स्थानकावर वाहनततळाची निर्मिती करून स्थानकाच्या समोरील बाजूस छोटे वाहनतळ उभे केले. ही जागा पुरेसी आहे. असे समजून  दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

खारघर स्थानकावर वाहनतळावर सध्या दुसरा तरी काही उपाय नाही. त्यामुळे आहे त्या जागेतच वाहने उभी करावी लागणार आहे. - मोहन निनावे जनसंपर्क अधिकारी सिडको 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Planning of parking at CIDCO railway station is failed in Kharghar