क्या बात है! मुंबईत प्लाझ्मा दानाला वाढता प्रतिसाद, सायन रुग्णालयात 'इतक्या' कोरोनामुक्त रूग्णांनी केला प्लाझ्मा दान..

plasma
plasma

मुंबई: मुंबईतील पालिका रुग्णालयात कोरोनामुक्त रूग्णांकडून प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसत आहे. केईएम आणि नायरनंतर पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातही रुग्ण आणि डाॅक्टरांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेषतः जे डाॅक्टर कोविड सेवा देत होते त्यांनी या आजारातून मुक्त होऊन प्लाझ्मा दान केला आहे. 

सायन रुग्णालयात आतापर्यंत 2 ते 3 डॉक्टरांनी आणि 7 रुग्णांनी प्लाझ्मा दान केला असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. 

मुंबईत आतापर्यंत फक्त 1 टक्का म्हणजेच 100 कोरोनामुक्त रूग्ण आणि कोरोना वाॅरियर्सने प्लाझ्मा दान केला आहे. हे प्रमाण वाढावं म्हणून पालिका रुग्णालयातील डाॅक्टर्स कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना संपर्क करत आहेत. मात्र, बरे होण्याच्या तुलनेत प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण कमी असल्याकारणाने वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही आवाहन करण्यात येत आहे. 

"रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा यासाठी सतत संपर्क केला जात आहे. सायनमध्ये आतापर्यंत 10 जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. त्यात डाॅक्टर आणि रुग्णांचा समावेश आहे. हे स्वेच्छेने करण्याचे दान आहे. पण, तरीही रुग्ण पुढाकार घेत आहेत," असे  सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल यांनी म्हंटले आहे. 

पालिकेच्या रुग्णालयातील प्लाझ्मा दान: 

केईएम रुग्णालयात आतापर्यंत एकूण 10 जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. यात 7 डाॅक्टरांचा समावेश आहे. तर, 3 कोरोनामुक्त रूग्णांचा समावेश आहे. एकूण 12 जण प्लाझ्मा दान करण्यासाठी आले होते. मात्र, दोघेजण प्लाझा दान करण्यासाठी सुदृढ नव्हते. म्हणून आतापर्यंत 10 जणांनी प्लाझ्मा दान केला आहे.

त्यात सर्वाधिक डाॅक्टरांचा समावेश असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. तर, नायर रुग्णालयात आतापर्यंत 53 हून अधिक रुग्णांनी प्लाझ्मा दान केला आहे. आणि आता सायन रुग्णालयात 10 प्लाझा दान केला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

plasma donation is increasing in mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com