उल्हासनगरातील आरकेटी कॉलेजच्या स्लॅबचे प्लॅस्टर कोसळले

दिनेश गोगी
शनिवार, 30 जून 2018

उल्हासनगर : आज उल्हासनगरातील नामचीन आरकेटी कॉलेजच्या दोन ठिकाणचे प्लॅस्टर कोसळल्याने विद्यार्थी भयभीत झाले.या घटनेची माहिती मिळताच युवासेनेचे कॉलेजवर धडक दिली असून कॉलेजचे तातडीने स्ट्रकचर ऑडिट करण्याची मागणी कॉलेज प्रशासनाकडे केली आहे.

कॅम्प नंबर 3 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आरकेटी कॉलेज आहे.सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी वाचनालय वाचत  बसले होते.आणि कँटीन मध्ये नाश्ता करत असतानाच तेथील स्लॅबचे प्लॅस्टर खाली कोसळले.या अनपेक्षित घटनेने भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी बाहेर धाव घेतली.

या घटनेची माहिती मिळताच युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,सुमित सोनकांबळे,शाखाप्रमुख सुनीलसिंग कलवा,कॉलेज कक्ष अध्यक्ष किशोर परदेशी,करण जाधव,करण राजपूत,विश्वजित शर्मा,भावेश सोनवणे,दीपेश राजपूत,विशाल कलशेट्टी आदींनी कॉलेजवर धडक दिली.उल्हासनगर पालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांनी देखील कॉलेज गाठले.या घटनेबाबत युवसेनेच्या वतीने कॉलेज प्रशासनाला निवेदन दिले असून तातडीने कॉलेजचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिले आहे.या घटनेत सुदैवाने कोणता विद्यार्थी जखमी झालेला नाही.या स्लॅबच्या प्लॅस्टरच्या कमकुवतपणा बाबत एका वर्षांपूर्वीच निवेदन दिले असताना ही बाब गांभीर्याने घेण्यात आली नाही.लवकरात लवकर कॉलेजचे स्ट्रक्चर ऑडिट केले नाही तर युवसेनेच्या वतीने आंदोलन छेडले जाणार.असा इशारा युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी दिला आहे.

Web Title: plaster of slab fallen of RKT college in ulhasnagar