प्लास्टिक पिशवीला अधिकारी जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या फेरीवाले-दुकानदारांकडे आढळल्यास त्या भागातील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण मुंबईत १५ डिसेंबरपासून प्लास्टिकविरोधी कारवाई सुरू केली जाणार आहे.

राज्य सरकारने २३ जानेवारीपासून प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर मुंबई महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली होती. त्यासाठी ३१० निरीक्षकांची पथके तयार करण्यात आली आहेत. निरीक्षकांच्या निळ्या पथकात (ब्ल्यू स्क्वॉड) बाजार, परवाना आणि आस्थापना विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना निळा कोट आणि काळी टोपी असा गणवेश देण्यात आला आहे.
पालिकेचे पथक प्रत्येक दिवशी ६० हजार ते एक लाखापर्यंत दंड वसूल करत आहे. काही दिवशी दंडवसुली तब्बल तीन लाखांवर जात असल्याचे सांगण्यात आले; परंतु आजही काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अधिकाऱ्यांना प्लास्टिकबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेने नियुक्ती केलेल्या निरीक्षकांकडून संपूर्ण मुंबईत प्लास्टिकविरोधी कारवाई सुरू आहे. कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी विभागनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विजय बालमवार, उपायुक्त, मुंबई महापालिका

Web Title: The plastic bag officer responsible