#Plasticban पहिला दिवस जागृतीचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

मुंबई - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला राज्यात आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सरकार आणि प्रशासनाचा भर जनजागृतीवर राहिल्याचे चित्र होते. मात्र रविवार आणि सोमवारपासून कारवाई कडक होण्याची शक्‍यता आहे.  दरम्यान, मुंबई, ठाणे, पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांत आज दिवसभरात जनजागृती मोहिमेबरोबरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

मुंबईत प्लॅस्टिकबंदीच्या आजच्या पहिल्या दिवशी पालिकेने कोणतीही कारवाई न करता काही विभागांत जनजागृती केली. सकाळपासून पालिका मुख्यालय, सीएसटीएम परिसर, क्रॉफर्ड मार्केट आदी भागांत रॅली काढण्यात आल्या. उद्यापासून (ता. २४) धडक कारवाईला सुरवात होणार आहे. 

खेड तालुक्‍यात चार दिवसांपासून बंदी
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या खेड तालुक्‍यात (जि. रत्नागिरी) प्लॅस्टिक पिशव्यांवर चार दिवसांपासून बंदी लागू केली आहे. तसेच आजपासून खेड शहरातील शाळा, कॉलेजमध्ये प्लॅस्टिकमुक्ती अभियान सुरू झाल्याची माहिती पालिकेने दिली.

ठाणे - महापालिकेने केला ९५ हजाराचा दंड वसूल
नाशिक - शहरात ७२ जणांवर कारवाई
नगर - प्रोफेसर चौकातील एका व्यापाऱ्यास दंड
सोलापूर - ४३ दुकानांवर कारवाई; ६०० किलो प्लॅस्टिक जप्त
कोल्हापूर - चार व्यापाऱ्यांवर कारवाई; ६५० किलो प्लॅस्टिक जप्त
रत्नागिरी - पालिका कर्मचाऱ्यांची जनजागृती मोहीम
सांगली - १ लाखाची दंडवसुली 
औरंगाबाद - कारवाईसाठी कोणीही फिरकले नाही
नांदेड - शहरातील १३ व्यापाऱ्यांवर कारवाई
नागपूर - विभागातील बहुतांशी जिल्ह्यात जनजागृतीवर भर

Web Title: Plastic Ban