प्लास्टिक बंदीचे मानापमान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - प्लास्टिक बंदीला पर्याय देण्यासाठी महापालिकेने वरळी येथे भरवलेल्या प्रदर्शनात लोकप्रतिनिधींना मानाची खुर्ची न मिळाल्याचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. अखेरीस प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यावर या वादावर पडदा पडला. 

वरळीत महापालिकेच्या प्रदर्शनात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना व्यासपीठावर जाण्यापासून रोखले होते. त्यावर आज शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. यासाठी जबाबदार असलेल्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. 

व्यासपीठावर खुर्च्या नसल्याने लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर बोलवता आले नाही, अशी सबब प्रशासनाकडून पुढे केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी खुर्च्या कशा उपलब्ध होतात, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला; त्यावर या प्रकाराबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकला. 

शिवसेनेला चिमटा 
शिवसेनेला प्लास्टिक बंदीची घाई झाली होती. कार्यक्रमाला सेलिब्रेटींना बोलावले, पण नगरसेवकांना नाही. आम्हाला वाटले हा कार्यक्रम एका पक्षाचा होता, असा चिमटा भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेनेला काढला. 

जाहिरातच तुमचे निमंत्रण! 
विरोधी पक्षनेता आहे, कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. महापौरांना विचारल्यावर त्यांनी कार्यक्रमास येण्यास सांगितले. प्रशासनाला जाब विचारल्यावर वृत्तपत्रामधील जाहिरात हेच निमंत्रण असे सांगण्यात आले, अशी खंत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपचे गटनेते रईस शेख यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. 

Web Title: plastic ban mumbai news