उल्हासनगर पालिका प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर

plastic
plastic

उल्हासनगर : प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यात तब्बल साडेचार टन प्लॅस्टिकचा माल जप्त करण्यात आला असून सव्वापाच लाख रुपयांची दंडात्मक रकम वसूल केली आहे.

महाराष्ट्रात प्लॅस्टिक विक्रीवर तसेच साठा बाळगण्यावर बंदी करण्यात आलेली आहे.तरीही विक्रीचा,साठा बाळगला तर जप्ती सोबतच दंडात्मक रकम आकारण्यात येणार.असा इशारा पालिकेने व्यापाऱ्यांना-दुकानदारांना-हातगाडी धारकांना दिला होता.याशिवाय चोरी छुपे ठेवण्यात आलेल्या साठ्याची,विक्रीची कुणाला कळल्यास नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असे आवाहन तत्कालीन आयुक्त गणेश पाटील यांनी केले होते.या आवाहनानुसार मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, भगवान कुमावत यांनी अनपेक्षितरित्या छापेमारी करणे सुरू केले.

प्लॅस्टिकचा साठा बाळगणारे मोठमोठे सावज या छापेमारीच्या जाळ्यात सापडले. काही नागरिकांच्या निनावी फोनचा देखील फायदा यावेळी झाला आणि दोन महिन्यात काही किलोच्या घरात नाही तर थेट साडेचार टन प्लॅस्टिक जप्त करताना सव्वापाच लाखाची वसुली पालिकेने केली. ही छापेमारीची-जप्तीची-दंडात्मक रकम वसुलीची मोहीम विद्यमान आयुक्त अच्युत हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूच राहणार असल्याने 2018 च्या वर्ष अखेरी पर्यंत प्लॅस्टिक जप्ती सहा-सात टनाच्या आणि दंडात्मक रकम सात लाखाच्या घरात पोहचणार असे चित्र दिसू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com